By  
on  

‘पावनखिंड’नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ या दिवशी होतोय प्रदर्शित

महाराष्ट्राच आराध्य  दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रसिध्द दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमारुपात अनेक शिवपुष्प वाहिली. फर्जंद, फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटानंतर पावनखिंड हा चित्रपट आणला. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. लवकर दिग्पाल लांजेकर शिवाजी महाराजांवर एक चित्रपट घेऊन येणार आहे. नुकतीच त्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे.

इन्स्टाग्रामवर आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर शेयर करत ते म्हणतात, आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला,अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडलासहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह.... शेर शिवराज २२ एप्रिल २०२२...हर हर महादेव

दिग्पाल लांजेकर यांचा आगामी सिनेमा शेर शिवराज हा येत्या 22 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive