By  
on  

“लाडकी लेक रूमानी आज टीव्हीवर पदार्पण करते…”, प्रसिध्द कवी संदीप खरे यांची पोस्ट

प्रसिध्द कवी संदीप खरे यांचा संगीतकार-दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांच्यासोबतचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम प्रसिध्द आहे. या कार्यक्रमाचा आण त्यांचाही खुप मोठा चाहतावर्ग आहे. संदीप खरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेक रुमानी खरे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याचे सांगितले आहे.

संदीप खरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्यांच्या मुलीच्या छोट्या पदार्पणाविषयी सांगत संदीप म्हणाले, “लाडकी लेक रूमानी आज टीव्हीवर पदार्पण करतेय, एका छान भूमिकेतून. आजपासून सुरु होत असलेल्या एका नव्या मराठी मालिकेतून. ‘तू तेव्हा तशी’ झी मराठी वर आज रात्री ८ वाजता. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तिच्याही पाठीशी सदैव राहू देत, हीच प्रार्थना.”

या मालिकेच्या निमित्ताने रुमानी खरेला अभिनेता स्वप्नील जोशी व अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. 

 

 

रुमानीने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. २०१९ मधील ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive