By  
on  

विशु तुझं माझ्या बरोबर असणं भाग्याचं आणि आनंदाचं आहे - समीर चौगुले

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अफलातून अभिनयाने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे खळखळून हसवणारी लाडकी जोडी म्हणजे समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. या हास्यसम्राट आणि हास्यसम्राज्ञीचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. आपल्या धम्माल स्किट्समधून या जोडीे रसिकांच्या हदयावर अधिराज्य गाजवलं आहे. आज अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा वाढदिवस. म्हणूनच वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देताना समीर चौघुले यांनी आपल्या सखीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

समीर चौगुले विशाखा यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हणतात, Vishakha Subhedar विशु ...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... विलक्षण आणि विस्मयकारक ताकदीची कलावंत...अफाट आणि अचाट टायमिंग गाठीशी ठेऊन रंगमंचावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री....विनोदाची उत्तम समज आणि क्षणार्धात कमालीचे भाव चेहेऱ्यावर आणून प्रेक्षकांना अचंबित करणारी आमची विशु....माझं भाग्य की ही अतरंगी बहुगुणी माझी जोडीदार आहे आणि माझी सखी मैत्रीण आहे..."सम्या विशु" या जोडीच्या यशात बहुतांशी वाटा विशुचा आहे...आतून प्रेमळ माऊली असलेल्या आमच्या विशुत कुशल कठोर नेतृत्वगुण ही दडलेले आहेत..आणि याच गुणांमुळे ती आज उत्कृष्ट नाट्यनिर्माती म्हणून घट्ट पाय रोवतेय.....विशु तुझं माझ्या बरोबर असणं भाग्याचं आणि आनंदाचं आहे..जे मनात आहे ते सगळं तुला मिळो ही गणराया चरणी प्रार्थना.........Happy birthday dear.....

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive