By  
on  

स्वप्नपूर्ती! सिध्दार्थ-मितालीने मुंबईत खरेदी केलं नवं घर

मराठी सिनेविश्वातील एक क्युट सेलिब्रिटी जोडी म्हणून सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर चर्चेत असतात. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या या जोडीने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आणि त्याची पत्नी मिताली दिसत आहे. यावेळी त्या दोघांच्याही अंगठ्याला शाई लागल्याची दिसत आहे. यासोबत त्याने मुंबईत नवीन घर घेतल्याची गुडन्यूज दिली आहे. सिद्धार्थने हा फोटो शेअर करताना त्याला हटके कॅप्शनही दिले आहे.

“एक नवी सुरुवात… मुंबईतील आमचे पहिले घर”, असे त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्यासोबत त्याने #tinypandahouse असा हॅशटॅगही शेअर केला आहे. त्याची ही गुडन्यूज ऐकल्यानंतर चाहतेही फार खूश झाले आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive