By  
on  

'मैं थकेगा नहीं साला..' डॉ. अमोल कोल्हेंंचा हा व्हिडीओ पाहिलात का?

ऐतिासिक भूमिकांसाठी प्रसिध्द असणारे प्रसिध्द अभिनेते आणि डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मिडयावर खुप सक्रीय असतात. अनेकदा ज्वलंत विषयावर ते व्यक्त होतात. नुकताच अमोल कोल्हे यांनी त्यांच्या हेवी वर्कआऊटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा हा जबरदस्त ्व्हिडीओ व्हायरल तर झालाचा आहे,  पण तो तरुणांना खुप प्रेरणाही देतोय. 

ते जिममध्ये कठोर मेहनत घेताना दिसत आहेत. वर्कआऊट करताना डॉ. कोल्हे घामाघूम झालेले दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत डॉ. कोल्हे यांनी म्हटलं आहे की, 'यह टायर तो फायर निकला...लेकिन मैं थकेगा नहीं साला...लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीनं बडवत दुसऱ्या हातानं कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल.' डॉ. कोल्हे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive