By  
on  

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान, चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट पदवी प्रदान

सैराट सिनेमामुळे देशाच्या कानाकोप-यात पोहचलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सिनेमांची यशस्वी घौडदौड सुरुच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. विविध स्तरांतून आणि मान्यवरांकडून या सिनेमाचं भरभरुन कौतुक झालं. महानायक अमिताभ बच्चन सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. आता नागराज मंजुळेंच्या नावापुढे आता डॉक्टर असं बिरुद लागलं जाणार आहे.डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. 

नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा हनुमंत लोखंडे यांनी नुकतंच फेसबुकवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. नागराज मंजुळे यांनी डॉक्टर पदवी स्विकारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive