By  
on  

'रिवणावायली'चा टीझर प्रदर्शित, चित्रपट ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

'स्त्री' जितकी शिकलेली असते तितकाच समाज पुढारलेला असतो असे म्हणतात, पण आपल्या देशात अजून अनेक भागात स्त्री शिक्षण कमी प्रमाणात आढळून येत. त्यातच अनेकदा शिकण्याची तयारी आणि आवड असलेल्या मुलीला डावल जात. तिला स्वतःच्या पायावर उभ राहण्याआधीच तिची संसाराशी गाठ मारून दिली जाते. अशात एक बंडखोर तरुणीने आपल्या शिक्षणाची धरलेली कास तिचा शिकण्याचा अट्टाहास यांची कथा 'रिवणावायली'मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

                     रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं; एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते. अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिक अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी जटणाऱ्या 'ऐश्वर्या देसाई' या बंडखोर मुलीची ही कथा आहे येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रिवणावायली चित्रपटाचा टीझर नुकताच ऑनलाईन प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या बाबतीत सकारात्मक चर्चा दिसून येत आहे. एका बंडखोर तरुणीची कथा मांडताना तिला घरून आणि समाजातून येणारे अडथळे यांची सत्य परिस्थिती हा चित्रपट मांडतो. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे सोलापूर मध्ये झाले असून त्यासाठी निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम यांनी स्वतःहून जातीने या चित्रपटाच्या निर्मितीत पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाचे  छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive