By  
on  

'बिती रात आए थे तुम ख्वाब में मेरे..' म्हणत आई फेम मधुराणी गोखले-प्रभुलकरने शेयर केला हा फोटो

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.

 सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी मधुराणी अनेकदा तिचे फोटो व्हिडीओ चाहत्यांशी शेयर करते. नुकताच तिने मालिकेतला तिचा एक सुंदर लुक चाहत्यांशी शेयर केला आहे. यात तिने मालिकेतील अरुंधतीच्या म्युझिक अल्बमच्या लॉंच सोहळ्यातला हा एक क्षण शेयर केला आहे. या साडीत आणि लुकमध्ये अरुंधती खुपच सुंदर दिसतेय. विशेष म्हणजे या फोटोला मधुराणीने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरतंय. 

बिती रात आए थे तुम ख्वाब में मेरे , इतनी फुरसत तुम्हे मिली कैसे...!!!,, असं कॅप्शन अरुंधतीने या फोटोला दिलं असून चाहत्यांची या फोटोला विशेष पसंती मिळतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive