By  
on  

जावळीच्या जंगलाचा राजा एकच...‘शेर शिवराज’सिनेमाचं पोस्टर रसिकांच्या भेटीला

प्रसिध्द दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराजचं एक नवं पोस्टर नुकतंच रसिकांसमोर उलगडलं. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड यानंतर त्यांचा हा पुढचा  सिनेमा येतोय. या सिनेमातला अभिनेता चिन्मय मांडलेकरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लुकमधलं पोस्टर सोशल मिडीयावर प्रसिध्द करण्यात आलं आहे. 

शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली, असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय 22 एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. 

‘जावळीच्या जंगलाचा राजा एकच... तो म्हणजे, सह्याद्रीचा वाघ ‘छत्रपती शिवाजी महाराज!’ असं खास कॅप्शन देत अभिनेता चिन्मय मांडलेकरने हे सिनेमाचं पोस्टर शेयर केलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive