By  
on  

काय सागंता, विराजस आणि शिवानीने केलं गुपचूप लग्न?

माझा होशील ना या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे या सिनेसृष्टीतल्या गोड कपलने नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नात्याची कबुली दिली होती. 

विराजस आणि शिवानीने त्यांच्या सोशल मीडियावर दोघांचा एक खास फोटो शेअर केला होता. तसंच शिवानी आणि विराजसने शेअर केलेल्या फोटोमध्ये शिवानी तिच्या हातातील अंगठी दाखवताना पाहायला मिळाली आणि त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. पण नुकतंच या दोघांच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला ाहे, त्यामुळे या दोघांनी गुपचुप लग्न केलं का अशा चर्चांना उधाण आलं आहे. चाहत्यांसह अनेक जण या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 

पण या व्हिडीओंमागचं तथ्य असं की, हा खराखुरा व्हिडीओ नसून ही एक एड फिल्म आहे. दोघांनीन एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी हे लग्नाचं शूटींग केलं आहे. त्याचाच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive