By  
on  

Video : जेव्हा सिध्दार्थला त्याची पत्नी बरेच दिवसांनी भेटते तेव्हा....

मराठी सिनेविश्वातील एक क्युट सेलिब्रिटी जोडी म्हणून सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर चर्चेत असतात. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या या जोडीच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते खुप उत्सुक असतात. सध्या या जोडीचा एक रोमॅण्टिक पण तितकाच मजेशीर व्हिडीओ सिध्दार्थ चांदेकरने शेयर केला आहे. या क्युट व्हिडीओवर मिताली मयेकरसह अनेक सेलिब्रिटींनी धम्माल कमेंट्स केल्या आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून सिध्दार्थची पत्नी मिताली मयेकर ही गोव्यात होती. बराच काळ तिथे घालवल्यानंर मिताली ही घरी परतली त्यामुळे नवरोबा सिध्दार्थ चांदेकर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि चक्क एक रील व्हिडीओ शेयर करत त्याने तो व्यक्त केला. 

खुप दिवसांनी जेव्हा तिची भेट होते...असं कॅप्शन देत सिध्दार्थने हा रील व्हिडीओ शेयर केलाय, तर मितालीने हा हा हा..इडियट असं म्हणत या पोस्टवर कमेंट केलीय. 

 

सिध्दार्थ आणि मितालीने जानेवारी   २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी ते चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive