By  
on  

Video : डॉक्टर आणि डिंपलच्या हळदीला वाड्यावर गावक-यांचा धुमाकूळ

देवमाणूस या रहस्यमय थरारक  मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेच्या अफाट यशानंतर आता या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेचे संपूर्ण महाराष्ट्रभर असंख्य चाहते आहेत. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या आहेत. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगच्या व्यक्तिरेखेतील किरण गायकवाड, टोण्या, सरु आजी, डिंपल, बाबूदादा, मंगलताई, बज्या, नाम्या या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

पहिल्या भागाप्रमाणेच दुस-या भागातही अनेक नवनवी पात्रं एन्ट्री घेत आहेत. पण सगळे मिळून मात्र एकदम धम्माल उडवून देत आहेत. पहिल्या भागात डिंपल आणि अजितकुमारचं लग्न होता होता राहिलं. त्यामुळे मालिकेच्या दुस-या भागात पुन्हा एकदा या दोघांचं लग्न लागणार का याची उत्सुकता आहे. डॉक्टरसोबत बोहल्यावर चढण्यासाठी डिंपल आमरण उपोषणाला बसली आणि अखेर डॉक्टरचा होकार तिने मिळवलाच .

डॉक्टर आणि डिंपलच्या हळदीला सगळयांनी जबरदस्त धम्माल केली. त्याचा हा ऑनसेट पण ऑफस्क्रीन व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive