By  
on  

आर्ची फेम रिंकू म्हणते, "ख़ूबसूरती न सूरत में है न लिबास में..."

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. दरम्यान सोशल मिडीयावरुनही रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. 

रिंकूने साडीतले घायाळ करणारे फोटो पोस्ट करत चाहत्यांचंं लक्ष वेधून घेतलं आहे. 

गुलाबी ब्लाऊज आणि साध्या कॉटनच्या फ्लॉवर प्रिंट साडीमध्ये रिंकूच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

या साडीतल्या तिच्या अदा पाहून तुम्हालाही याड लागेल.

चाहत्यांनी रिंकूच्या या खास फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive