By  
on  

ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे म्हणतात, “राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची…”,

नाटक, मालिका आणि सिनेमांमधील चतुरस्त्र भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. विविध विषयांवर ते आपलं रोखठोक मत मांडताना दिसतात.  नुकतंच शरद पोंक्षे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

 राज ठाकरेंच्या यांच्या कालच्या सभेतील भाषणावर वक्तव्य केले. “आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब.”,

शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर पोस्ट करत यावर भाष्य केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक लाइक्स कमेंट पाहायला मिळत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive