By  
on  

अभिनेता हार्दिक जोशी म्हणतो, 'आपण फिट तर आयुष्य हिट..'

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी हा प्रेक्षकांचा आवडता आहे. तुझ्यात जीव रंगला मधील राणा असो किंवा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील सिद्धार्थ, हार्दिक फक्त अभिनयानेच त्या भूमिका आत्मसात करत नाही तर त्या भूमिकेला अनुसरून आपली शरीरयष्टी आणि देहबोली याकडे देखील तितकाच लक्ष देतो.

 

 

व्यस्त दिनक्रमातून त्याच्या आरोग्याची काळजी तो कशी घेतो याबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, "खरं तर आजच्या काळात आरोग्याची काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि मुळात मी फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळे दैनंदिन मालिका करताना आपल्याला स्वतःसाठी वेळ काढावा लागतो हे खरं आहे, त्यामुळे मी जरी मी मालिका करत असलो तरी मी जसा वेळ मिळेल तसं जिमला जातो.

 

शिफ्टच्या आधी किंवा नंतर दीड ते दोन तास वर्कआउट करतो. जर अगदीच वेळ ऍडजस्ट होत नसेल तर सीनच्या मध्ये जर फावला वेळ असेल तर अराम न करता मी तेव्हा जिमला जातो आणि परत येऊन शूटिंग करतो. माझ्यासाठी फिटनेस खूप महत्वाचं आहे. मी अभिनय क्षेत्रात आहे म्हणून नाही तर वयक्तिक आयुष्यात देखील फिटनेस खूप महत्वाचा आहे सर्वांसाठीच. कारण जर आपण फिट असू तर आयुष्य हिट आहे असं मी नेहमी म्हणतो."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive