By  
on  

आशा भोसले यांच्या मुलाला दुबईतील रुग्णालयात केलं दाखल,आयसीयूत उपचार सुरु

प्रसिध्द दिग्गज गायिका आशा भोसले यांचा धाकटा मुलगा आनंद याला दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आहे. आनंद अचानक बेशुद्ध पडले आणि जमिनीवर कोसळले. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. आनंद यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. परंतु सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आशाताई या आता मुलासोबतच आहेत. आनंद यांना अचानक चक्कर आल्याने कुटुंब चिंताग्रस्त झालं आहे. 

दरम्यान आशा भोसले यांना एकूण तीन मुलं. आशाताईंचा मोठा मुलगा हेमंत भोसले यांचं वयाच्या 66 व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. हेमंत हे निधनाच्यावेळी स्कॉटलंडमध्ये रहात होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हेमंत भोसले यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी रचली आणि संगीत नाटक अकादमीपासून फिल्मफेअर आणि २ राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले होते.तर आनंद हे आशा भोसले यांचा धाकटा मुलगा आहे, जे व्यवसाय आणि चित्रपट दिग्दर्शन करता्त.

आशा भोसले यांची एक मुलगी वर्षा यांनी २०१२ मध्ये आत्महत्या केली होती. वर्षा भोसले यांनी घरातील परवानाधारक पिस्तुलाने स्वतावर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं गेलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive