By  
on  

ह्रता दुर्गुळे आणि प्रतिक शाहच्या लग्नाची तारीख आली समोर, पण अभिनेत्री म्हणते..

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अनेक प्रसिध्द सेलिब्रिटी जोड्या लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळतंय. अशातच प्रसिध्द टी.व्ही अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतीक शाह यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही सोशल मिडीया अकाऊंट्सवर ्ह्रता व प्रतीकच्या लग्नाची तारीख जाहीर झाल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. या अकाऊंट्सवर ह्रता व प्रतीक हे येत्या मे महिन्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचं म्हटलं आहे, पण या बातमीतलं तथ्य खुद्द ह्रतानेच सांगितलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

 

एका न्यूज पोर्टलशी बोलताना ह्रता म्हणाली, माझ्या लग्नाच्या तारखेवरुन ज्या चर्चा सुरु आहेत यात अजिबात तथ्य नाही. आमचं लग्नाबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही. येत्या 10 जून रोजी माझा सिनेमा अनन्या प्रदर्शित होत आहे. त्यामुळे संपूर्ण मे महिना मी ह्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असेन. त्यामुळे माझ्या आणि प्रतीकच्या लग्नाच्या तारखेची जी बातमी समोर येतेय ती सपशेल चुकीची आहे. 

 

 

सध्या ह्रता दुर्गुळेची झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेता अजिंक्य राऊत आणि ह्रताची जोडी प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडते. तसंच तिचं दादा एक गुड न्यूज आहे हे उमेश कामतसोबतचं नाटकही तुफान सुरु आहे. 

ह्रताने खुद्द लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम लावला. ह्रता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतीक शाह यांचा डिसेंबर 2021 मध्ये साखरपुडा पार पडला. या जोडीच्या साखरपुड्याच्या फोटोंची खुप चर्चा झाली. आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive