By  
on  

" प्रेमात पडले ...." म्हणत प्राजक्ता माळीने शेयर केला नऊवारीतला खास लुक

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

नऊवारी साडी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लावण्य. नऊवारीत स्त्रीचं सौंदर्यं खुलतं. प्राजक्ताने नुकतंच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या चंद्रमुखी स्पेशल भागासाठी नऊवारी नेसली होती. 

निळ्या रंगाच्या जरतारीच्या नऊवारी साडीत प्राजक्ताच्या सौंदर्याला चार चॉंद लागले. 

या खास  फोटोशूटमध्ये प्राजक्ताचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळाला. 

बाई गं कसं करमत न्हाई गं म्हणत प्राजक्ता लिहते मी या चंद्रमुखी सिनेमातील गाण्याच्या प्रेमात पडलीय. 

चंद्रमुखीच्या प्रोमोशनसाठी अमृता खानविलकरसोबत प्राजक्ताने चंद्रा गाण्यावर जबरदस्त तालही धरला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive