By  
on  

या मराठी अभिनेत्याने जॉईन केलं Microsoft, सोशल मिडीयावर केली पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. आगामी प्रोजेक्ट्सबदद्ल आणि विविध विषयांवर तो व्यक्त होतो. चाहतेसुध्दा त्याच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहतात,  पण नुकतंच त्याने सोशल मिडीयावर फोटोसह एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना बुचकळ्यात पाडलं आहे.सुबोध आता अभिनयाला राम राम ठोकणार की काय की काय ते नेमका या पोस्टचा अर्थ काय अशा अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत.

झालं असं की, सुबोध भावेने मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या ऑफिसमधील एक फोटो पोस्ट केला आहे. सुबोध हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लोगो आणि नाव असलेल्या भिंतसमोर उभा राहून हसताना या फोटोत दिसतोय. मात्र या फोटोहून अधिक चर्चा या फोटोला देण्यात आलेल्या कॅप्शनची आहे. सुबोधने हा फोटो शेअर करताना, “जस्ट जॉइण्ड… मायक्रोसॉफ्ट” अशी कॅप्शन दिलीय. मात्र परदेशात गेल्यानंतरही त्याने मराठी बाणा सोडला नसल्याचं याच फोटोला दिलेल्या कॅफ्शनमधील पुढच्या ओळीत दिसतंय. “आमच्या कडे “विंडोज” बसवून मिळतील,” अशी पुढील ओळ त्याने इमोजीसहीत पोस्ट केलीय.

 

सुबोध भावेच्या या भन्नाट कॅप्शनवर चाहत्यांनीही धम्माल कमेंटचा पाऊस पाडला आहे.

 

 

 सुबोध सध्या अश्रूंची झाली फुले या नाटकानिमित्त अमेरिका दौऱ्यावर आहेत. तो सिएटल या अमेरिकेतील शहरात असून तिथे मायक्रोसॉफ्टचं मोठं ऑफिस आहे. याच ऑफिसला सुबोधने भेट दिली.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive