By  
on  

अमेय वाघ म्हणतो, “कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की ..."

नेहमीच भन्नाट पोस्ट करत चाहत्यांना सरप्राईज करणा-या मराठी सिनेसृष्टीच्या वाघाने म्हणजेच अभिनेता अमेय वाघने त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

अमेय वाघ हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच अमेयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमेय हा गाडीत बसून ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील एक गाणे गुणगुणत असल्याचे दिसत आहे. अतिशय लयबद्घ स्वरुपात, चालीत आणि सुरात अमेय हे गाणे म्हणत आहे. विशेष म्हणजे तो एखाद्या शास्त्रीय गायकाप्रमाणे गाणे गात असताना हातवारेही करत आहे.

“कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की मराठी गाण्यांवरच चांगले reels बनवता येतात! “मी वसंतराव” चा तिसरा आठवडा सुरु! लवकर बघा!”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive