By  
on  

पुणे मेट्रोत अवतरली चंद्रमुखी, अमृता खानविलकरने धरला चंद्रावर ठेका

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकरच्या आगामी ुप्रोजेक्टसची चाहत्यांना बरीच उत्सुकता असते. अमृताचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चंद्रमुखी हा  सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, हा सिनेमा लावणीसम्राज्ञीच्या आयुष्यावर बेतला असून यात ती चंद्रा ही नायिका साकारतेय. तर दौलतराव देशमाने ह्या ध्येयधुरंदर राजकारण्याच्या भूमिकेत हॅंण्डसम हंक अभिनेता आदिनाथ कोठारे पाहायला मिळतोय. 

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या सिनेमाचा सर्वत्र बोलबाला आहे. सगळीकडे सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु असतानाच या टीमने एक हटके कल्पना लढवत पुणे मेट्रोत चंद्रावर फ्लॅश मॉब केला. या फ्लॅश मॉबचं नेतृत्व चक्क अमृता खानविलकरने केलं. आदिनाथसुध्दा यावेळी उपस्थित होता. 

अमृता खानविलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता खानविलकर ही पुणे मेट्रोत चंद्रा या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिच्यासोबत या मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या पुणेकरांनीही ठेका धरला आहे. यावेळी मेट्रोप्रवासी चंद्रमुखी सिनेमा पाहण्यासाटी उत्सुक असल्याचे दिसले. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive