By  
on  

अग्गंबाई सासूबाई ! भावी सासूबाई मृणाल कुलकर्णींसोबत शिवानी रांगोळेचं फोटोशूट

सध्या सर्वत्र सनई चौघडे वाजतायत. लग्नसराई सुरु आहे. कलाविश्वातील अनेक कलाकारसुध्दा यंदा बोहल्यावर चढतायत. पिपींगमूनने सर्वप्रथम मराठी सिनेसृष्टीतील लाडकी जोडी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाची तारीख चाहत्यांना सांगितली होती.

यंदा 7 मे रोजी शिवानी आणि विराजस लग्नगाठ बांधणार आहेत. 

सर्वांनाच माहितीय की, विराजस हा प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लाडका लेक आहे. नुकतंच मृणाल कुलकर्णी यांनी भावी सूनबाई अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत एक खास फोटोशूट केलं. 

एका जाहिरातीसाठी या सासू-सूनेच्या जोडीने हे पारंपारिक फोटोशूट केलं. 

या फोटोशूटमध्ये शिवानीने पिंक कलरची साडी नेसलीय तर मृणाल कुलकर्णी यांनी काळ्या रंगाची साडी नेसलीय. 

सासू-सूनेचं हे झक्कास फोटोशूट सध्या बरंच व्हायरल होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive