By  
on  

'शेर शिवराज'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई!

महाराष्ट्राचे आराध्यदैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हटलं की आपला ऊर अभिमानाने भरून येतो. आजवर आपण शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा वाचल्या, पाहिल्या पण त्यांच्या शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या शिलेदारांचा इतिहास आजवर अपवादानेच रुपेरी पडद्यावर मांडला गेला आहे. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ते शिवधनुष्य उचलले आणि मराठी रुपेरी पडदयावर कमाल केली. प्रत्येकाला इतिहासाची गोडी निर्माण होईल अशा पद्धतीने चित्रपटांची चित्रमालिका सुरु केली. या सर्व चित्रपटांनी एक वेगळा इतिहास रचला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटांच्या यशानंतर शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज'  हे चौथे चित्रपुष्प नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

'शेर शिवराजने बॉक्स ऑफीसवर आपली कौटीच्या कोटी उड्डाणे घ्यायला सुरुवात केलीय. शेर शिवराज’ शुक्रवारी (२२ एप्रिल) प्रदर्शित झाला आहे. अवघ्या दोन दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. फक्त दोन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतंच ट्विटरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई जाहीर केली आहे. तरण आदर्श यांन दिलेल्या माहितीनुसार, शेर शिवराज या चित्रपटाने एका दिवसात १.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive