By  
on  

'तुझेच मी गीत गात आहे'मालिकेत ही प्रसिध्द अभिनेत्री झळकतेय खलनायिकेच्या भूमिकेत

स्टार प्रवाहवर २ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका साकारणार आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर.तर स्वराच्या आईच्या भूमिकेत सुप्रसिध्द अभिनेत्री उर्मिला कोठारे आहे. 

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत सुप्रसिध्द अभिनेत्री प्रिया मराठे ही खलनायिका साकारत आहे. 

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका 2 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.  तुझेच मी गीत गात आहे या मालिकेसाठी रिअल लोकेशनचा वापर करण्यात येणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive