By  
on  

सीआयडी फेम दयासोबतचा फोटो शेयर करत विशाखा सुभेदार म्हणते...

कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारचे असंख्य चाहते आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून विशाखा रसिकांचं नेहमीच निखळ मनोरंजन करत आलीय. पण काही दिवसांपूर्वीच तिने या शोला रामराम ठोकल्याचं सोशल मिडीयावरुन सांगितलं होतं. त्यामुळे चाहते नाराज झाले होते. आता मात्र अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विशाखाने CID मालिकेत दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही लवकरच एका मराठी चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. विशाखाने हा फोटो शेअर करत दयानंद शेट्टीसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला आहे.

 

विशाखाने दयानंद शेट्टीसोबतचा फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “तोड दो ये दरवाजा, दया…#shoot #onset #setlife” असे तिने म्हटले आहे. तिच्या या फोटोत ते दोघेही एकत्र दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive