By  
on  

दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबतचा खास फोटो शेयर करत किरण माने म्हणतात...

'मुलगी झाली हो' या  लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. परंतु सोशल मिडीयावर आपल्या ज्वलंत लेखणीमुळे प्रसिध्द असलेले किरण माने यांना स्टार प्रवाहच्या या मालिकेतून काढल्यानंतर बराच वादंग पेटला. या प्रकरणाला राजकीय रंगही देण्यात आला. बरेच दिवस हे प्रकरण वेगवेगळ्या पैलूंनी चर्चेत राहिलं.

अभिनेते किरण माने यांनी नुकतंच प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबतचा एक फोटो शेयर करत पोस्ट लिहली आहे. 

अभिनेते किरण माने हे फेसबुकवर कायमच चर्चेत असतात. ते नेहमी फेसबुकवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. काही तासांपूर्वी त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबतचा एक कोलाज फोटो शेअर केला आहे. यातील पहिल्या फोटोत ते दोघे हातात हात घालून कोणत्या तरी विषयावर गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत नागराज मंजुळे हे किरण मानेच्या भूमिकेचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर तिसऱ्या फोटोत ते दोघेही छान हसत सेल्फी काढताना दिसत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive