By  
on  

अप्सरा आली..! नऊवारी नव्हे दहावारीत दिसला सोनालीचा रॉयल लुक

अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते. तिचे असंख्य चाहते आहेत. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची जशी चाहत्यांना उत्सुकता असते तशीच तिच्या सोशल मिडीयावर ती शेयर करत असलेल्या नवनव्या फोटोशूटची असते. अगदी चातकाप्रमाणे चाहते तिच्या फोटोशूट्सची वाट पाहत असतात.

नुकतंच सोनालीने पारंपारिक साजातलं एक रॉयल फोटोशूट शेयर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

लाल रंगाच्या फरच्या या खास दहावारी साडीत अप्सरेच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.

लाल फरची मखमली साडी कपाळी चंद्रकोर, नाकात नथ आणि पारंपारिक दागिने असा सोनालीचा हा लुक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवतो. 

नऊवारी आणि दहावारी साड्यांच्या एका प्रतिष्ठित ब्रॅण्डच्या एका स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी सोनालीने हा पारंपारिक साज केला होता. 

सोनालीच्या या खास फोटोशूटच्या प्रेमात चाहते पडले असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्ससचा वकर्षाव सुरु केला आहे.

सोनाली कुलकर्णीचे अनेक नवनवे सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

झिम्मा, पांडू  या सिनेमांच्या घवघवीत यशानंतर सोनालीचे व्हिक्टोरिया, स्वराज्यसौदामिनी ताराराणी हे सिनेमे लवकरच येत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive