By  
on  

'चंद्रमुखी'चा ट्रेलर पाहून धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणते...

चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती,‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या बहुचर्चित मराठी सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या  भेटीला आला आहे.  तमाशा कलावंत चंद्रा साकारणारी अमृता खानविलकर आणि दौलत देशमाने यांच्या  व्यक्तिरेखेतील आदिनाथ कोठारे यांच्या अनोख्या प्रेमकहाणीची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. सध्या सर्वत्र आगामी चंद्रमुखी या सिनेमाचीच जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक कलाकार या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव करताना पाहायला मिळतायत. धक धक गर्ल माधुरी दीक्षितनेही चंद्रमुखीचं केलेलं कौतुक चर्चेत आहे. 

 

माधुरीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर चंद्रमुखी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘किती अप्रतिम ट्रेलर आहे, मी नक्कीच चंद्रमुखी चित्रपट पाहणार’, असे तिने हे पोस्टर शेअर करताना म्हटले आहे. विशेष म्हणजे फक्त माधुरी दीक्षित नाही तर प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख, कॉमेडी क्वीन भारती सिंह अशा अनेक सेलिब्रिटींनी सिनेमावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive