By  
on  

“मला प्राण्‍यांची खूप भिती वाटायची, पण…”; सई ताम्हणकरने सांगितला ‘पेट पुराणचा अनुभव

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर ही सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. सध्या सई ताम्हणकर व अभिनेता ललित प्रभाकर यांच्या  आगामी पेटपुराण या वेबसिरीजची बरीच चर्चा सुरु आहे. या वेबसिरीजमध्ये दोघांची पाळीव प्राणी पाळतानाची तारंबळ पाहायला मिळतेय. पाळीव प्राण्‍याची कथा घेऊन येत सोनीलिव्‍हने त्‍यांची आगामी मराठी ओरिजिनल 'पेट पुराण'ची घोषणा केली आहे. ही पाळीव प्राण्‍यांचे पालनपोषण करण्‍यावरील उत्‍साहवर्धक सोशल कॉमेडी सिरीज आहे. हलक्या-फुलक्या सुखद क्षणांनी भरलेली आणि महाराष्‍ट्रीयन पार्श्‍वभूमीवर आधारित ही सिरीज शहरी, उदारमतवादी, विवाहित जोडपे अतुल व अदिती आणि त्‍यांचे दत्तक घेतलेले पाळीव प्राणी बाकू नावाची मांजर व व्‍यंकू नावाचा कुत्रा यांच्‍याभोवती याचं कथानक गुंफलं आहे. या सिरीजच्या ट्रेलरची सध्या सोशल मिडीयावर बरीच चर्चा रंगलीय. 

 या सिरीजमध्‍ये सई ताम्‍हणकर स्‍वावलंबी, प्रबळ इच्‍छाशक्‍ती असलेली, पण भावूक अदितीची भूमिका साकारणार आहे. अदिती पाळीव प्राण्‍याची पालक बनते तेव्‍हा तिच्‍यामध्‍ये आनंद व भावनेसोबत मातृत्‍व निर्माण होते. रोमांचक बाब म्‍हणजे वास्‍तविक जीवनात अभिनेत्री तिच्‍या या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. सई म्हणते,  ''मला एक अभिनेत्री म्हणून पाळीव प्राण्याच्या पालकाची भूमिका साकारण्याबाबत खात्री नव्हती, कारण पाळीव प्राण्यांशी भावनिकदृष्ट्या किती मिसळून जाईन हे माहीत नव्हते. पण आम्‍ही चित्रीकरणाला सुरूवात करताना पाळीव प्राणी मला माझ्या मुलांसारखेच वाटले आणि काम करताना कामासारखे वाटले नाही. त्‍यांच्‍यामागून धावणे आणि नेहमी माझ्यासोबत असण्‍याचा अनुभव उत्तम होता. खरेतर, मी कधीकधी ते अवतीभोवती असण्याचे मिस करायचे. मला खात्री आहे की, ही सिरीज पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्‍यांच्‍या  पाळीव प्राण्‍यांसोबतचे अनुभव आठवतील.  मी आशा करते की, आमची सिरीज अधिकाधिक लोकांना पाळीव प्राणी दत्तक घेण्‍यास प्रेरित करेल. ही सिरीज निश्चितच तुम्‍हाला अवतीभोवती असलेल्‍या केसाळ मित्रांच्‍या प्रेमात पाडेल. माझेच उदाहरण घ्‍या! मला आता प्राणी खूप आवडू लागले आहेत.''

 

 

‘पेट पुराण’चे दिग्‍दर्शन व लेखन ज्ञानेश जोटिंग यांनी केले असून ह्यूज प्रॉडक्‍शन्‍सचे रणजित गुगले हे या सीरिजचे निर्माते आहेत. सई ताम्‍हणकर आणि ललित प्रभाकर अभिनीत ही सिरीज ६ मे २०२२ रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्‍याळम, कन्‍नड व बंगाली या भाषांमध्‍ये सोनीलिव्‍हवर सुरू होणार आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive