By  
on  

राधिका आपटेने शेयर केला जखमी अवस्थेतील व्हिडीओ, चाहते चिंतेत

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वताचं स्थान निर्माण केलं आहे. फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी  सिनेसृष्टीच नाही तर जागतिक स्थरावरसुध्दा तिने आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. आपल्या बोल्ड भूमिकांमुळेसुध्दा राधिका नेहमीच चर्चेत असते. तिच्या वेबसिरीजचीसुध्दा चाहते आतुरतेने वाट पाहतात. सोशल मिडीयावरसुध्दा  ती बरीच सक्रीय असते. नुकतंच राधिकाने तिचा एक फोटो अपलोड करुन चाहत्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. यात तिच्या पोटावर जखम झाल्याचे दिसतेय. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

राधिकाने  इंन्सटावर एक व्हिडीओ शेयर केला. यात तिच्या पोटाला जबरदस्त जखम झाल्याचे दिसतेय. त्यामुळे सर्वचजण अवाक् झाले आहेत. पण पुढे ती फाटलेल्या शर्टमधून ती जखम दाखवतेय. खरं तर ही जखम नसून तो प्रोस्थेटिक मेकअप आहे. उन्हाळ्यामुळे तो मेकअप वितळतोय, असं राधिका सांगतेय,

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

राधिका आपटेच्या या भन्नाट व्हिडीओवर चाहते धम्माल कमेंट् करतायत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive