By  
on  

Video : चंद्रमुखीच्या गाण्यावर थिरकली चिमुकली मायरा, अमृता खानविलकर म्हणते...

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित  असलेल्याचंद्रमुखी या सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. अमृता खानविलकर या सिनेमाच चंद्रा ही लावणीसम्राज्ञी साकारतेय. तर ध्येयधुरंधर राजकारणी म्हणून डॅशिंग अभिनेता आदिनाथ कोठारे पाहायला मिळतोय. अमृताच्या सिनेमातील चंद्रा या लावणीची सोशल मिडीयावर लाट उसळलीय. हा डान्स करण्याचा मोह अनेक सेलिब्रिटी आवरु शकले नाहीत. नुकतंच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून रसिकांना प्रेमात पाडणारी चिमुकली परी फेम बालकलाकार मायरा वायकुळसुध्दा चंद्रा च्या गाण्यावर अफलातून थिरकली आहे. 

परी म्हणजे मायरा वायकुळने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यात ती हुबेहुब अभिनेत्री अमृता खानविलकरप्रमाणे नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे मायराने अगदी अमृताप्रमाणेच साडी नेसली आहे. तसेच हा डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरील हावभावही फार बोलके असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना तिने ‘चंद्रा’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे. ‘माझी गोंडस… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मायरा’, असे कमेंट तिने केली आहे. त्यावर मायराने ‘धन्यवाद…’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive