By  
on  

'आई कुठे काय करते'मधील तुमच्या लाडक्या अरुंधतीचा हा स्टायलिश लुक पाहिलात का?

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.

सोशल मिडीयावर अरुंधती नेहमीच सक्रीय असते. मालिकेविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी , सीन्सविषयी त्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल ती सतत व्यक्त होत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट-व्हिडीओंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. पडद्यामागच्यासुध्दा अनेक गोष्टी मधुराणी इथे शेयर करते. मधुराणीने नुकताच एक फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात तिचा वेस्टर्न लुक पाहायला मिळतोय. मोकळे केस आणि स्टायलिश टॉप असा तिचा लुक आहे. 

 

हा फोटो शेयर करत अरुंधतीने सर्वांना विकेंडच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive