By  
on  

छत्रपती शिवरायांच्य शूरवीरांची गाथा 'वीर दौडले सात', महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमाची घोषणा

महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपण महाराष्ट्र दिनी एका मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार महाराष्ट्र दिनाला त्यांनी यावरचा पडदा उलगडला आहे. या सिनेमाची कथा सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्यावर आधारित आहे.

महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टरही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरवर ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाचे नाव पाहायला मिळत आहे. “इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी २०२३”, असे त्यांनी यात म्हटले आहे.

 

 

‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग म्हणून गडहिंग्लजला ओळखले जाते. याच भागाच्या उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राज्याचे शेवटचे टोक. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आत्म बलिदान देत इतिहास अजरामर केला होता. याच सर्व लढाईवर हा चित्रपट साकारला जाणार आहे.

प्रतापरावांच्या याच शौर्यगाथेवर कवी कुसुमाग्रजांनी हे गीत लिहलं. म्यानातून उसळे तलवारीची पात.......वेडात मराठे वीर दौडले सात.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive