By  
on  

तुझ्यात जीव रंगला ! पाठकबाई आणि राणादाच्या रिअल लाईफ साखरपुड्याचे हे खास क्षण पाहा

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीनं त्यांच्या रिअल लाइफची ही आनंदवार्ता देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

राणादा आणि अंजलीबाईंच्या रिअल लाईफ साखरपुड्यातला हा अंगठी घालतानाचा व्हिडीओ खुप वेगाने व्हायरल होतोय.

दोघांचाही वेस्टर्न लुक चाहत्यांना भावतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या साखरपुड्यानं चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी सेलिब्रेटींनी कमेंट करत त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive