By  
on  

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर हा मराठमोळा अभिनेता चढणार बोहल्यावर

कलाविश्वात सध्या लग्नसराईचा मौसम सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींकडे लगिनघाई आहे. 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रसिध्द सेलिब्रिटी जोडी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे लग्नबंधनात अडकले तर अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील लाडक्या जोडीने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या दोन जोड्यांनंतर आता आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. हा अभिनेता म्हणजे गच्ची, लकी सिनेमा फेम अभय महाजन. 

अभिनेता अभय महाजन लवकरच लग्नबंधनात अडकतोय. मागच्यावर्षीच त्याने आपली मैत्रीण दिया नायडूसोबत साखरपुडा केला होता. त्याने साखरपुड्याचे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले होते. अभयचे सेलिब्रिटी मित्र आलोक राजवाडे आमि पर्ण पेठे यांनी त्याचं केळवण केलं, या केळवणाचे फोटो त्यांच्या स्टोरीवर पाहायला मिळाले. अभयचं लग्न मे महिन्यातचं होणार असल्याचं कळतंय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhay Mahajan (@abhaymaha)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive