By  
on  

प्राजक्ता माळीने विदाऊट ब्लाऊज नेसली साडी, फोटो होतायत व्हायरल

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

प्राजक्ता वेस्टर्न लूकमध्ये सुंदर दिसतेच. पण त्यापेक्षाही तिला पारंपरिक लूकमध्ये पाहणं नेटकरी पसंत करतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात तिच्या विविध आऊट्सफिट्सचं नेहमीच कौतुक होतं.

 आता तिने साडी नेसून फोटोशूट करत ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण प्राजक्ताने ब्लाऊज परिधान न करताच साडी नेसली आहे. विदाऊट ब्लाऊज साडी ही कसली फॅशन असा प्रश्न अनेकांना पडला. तसेच तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणाऱ्यासही सुरुवात केली.

 

‘प्राजक्ता ब्लाऊज परिधान करायला विसरलीस का?’ असा प्रश्न नेटकरी तिला कमेंट्सच्या माध्यमातून विचारत आहेत. तर काही जणांनी ‘तू खूप गोड दिसत आहेस’ अशा चांगल्या कमेंट्सही केल्या आहेत. अशा संमिश्र प्रतिक्रीया तिला येत आहेत.व 

या फोटोमध्ये तिने आसामी सिल्क साडी नेसली आहे. तसेच साडीवर लाल आणि निळ्या रंगाचं वर्क पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने परिधान केलेले दागिने विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत.

 

 

 

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive