उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्या नात्यात आला दुरावा ?

By  
on  

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी. अगदी दृष्ट लागण्यासारखा यांचा संसार. आपापल्या प्रोजेक्ट्समध्ये दोघेही नेहमीच व्यस्त असलेले पाहायला मिळतात. अनेकदा सोशल मिडीया माध्यमातून व्हिडीओ फोटोज शेयर करत ही जोडी चाहत्यांच्या भेटीला येते.

या दोघांच्या संसार वेलीवर एक गोड फुलही फुललंय. जिजा ही त्यांची लेक आता चार  वर्षांची आहे. सगळं काही आलबेल सुरु असताना सूत्रांनुसार एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ते म्हणजे, आदिनाथ आणि उर्मिलामध्ये काहीतरी बिनसलं आहे. याबाबतच्या अनेक चर्चा सध्या रंगल्या आहेत. पण नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

उर्मिलाने अलीकडेच छोट्या  पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तुझेच मी गीत गात आहे  मालिकेच्या माध्यमातून ती टीव्हीवर पुनरागमन करते आहे. तिने पुनरागमन करण्यासाठी स्वत:च्या पतीच्या प्रॉडक्शन हाऊसचा मार्ग सोडून दुसरा निवडल्याने त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये आणखी चर्चेला भर मिळण्याचे कारण म्हणजे आदिनाथने उर्मिलाला वाढदिवशी शुभेच्छासुध्दा दिल्या नव्हत्या. त्यामुळे चाहतेही बरेच नाराज झाल्याचे दिसून आले. तसंच आणखी एक कारण म्हणजे, पती आदिनाथचा चंद्रमुखी हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्या सिनेमाचं कुठलंच प्रमोशन पत्नी उर्मिलाने केलेलं नाही. उर्मिलासुध्दा एक उत्तम नृत्यांगना आहे. चंद्रमुखीच्या गाण्यांवर ती थिरकेल अशी प्रेक्षकांना आशा होती. पण तसं झालं नाही. 

दरम्यान, त्यांच्यामध्ये सध्या काय घडत आहे याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

महेश कोठारे दिग्दर्शित शुभ मंगल सावधानच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिलाची प्रेमकहाणी सुरु झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  डिसेंबर २०११ मध्ये ते विवाहबंधनात अडकले. जानेवारी २०१७ मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले.

Recommended

Loading...
Share