By  
on  

शरद पवारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करणं केतकी चितळेला पडणार महागात?

अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच शरद पवारांच्या विरोधात अपशब्द लिहल्यामुळे  केतकी चितळेवर कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच तिला ट्रोलही करण्यात येतंय. 

केतकी चितळेने फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा
ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक
सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे
समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप
ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर
भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा
खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड
याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड
 

 

केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर केतकी सोशल मीडियावरून तिचं मत मांडत असते. टोकाची मते लिहिल्याने अनेकदा केतकीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारी फेसबुक पोस्ट केतकीने केली आहे.

 

केतकीला जास्त महत्त्व देऊ नका. तिला अभिनय क्षेत्रात काम नसल्याने अशा वादग्रस्त पोस्ट करुन तिला चर्चेत यायचं असतं, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. आपलं वय किती, आपण बोलतो किती, आपल्या योग्यतेनुसार आपण बोलावं, आपली लायकी आहे का पवारसाहेबांवर बोलण्याची, असं म्हणत एका नेटकऱ्याने केतकीला सुनावलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive