मेक्सिकोमध्ये अप्सरेचा हनिमून, बिकीनी लूकमधून केलं चाहत्यांना घायाळ

By  
on  

 महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी यंदा ९ मे रोजी पती कुणाल बेनोडेकरसोबत दुस-यांदा बोहल्यावर चढली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं औचित्य साधत सोनाली आणि कुणालने शाही थाटात लग्नगाठ बांधली.

गेल्यावर्षी कौरोनामुळे रजिस्टर मॅरेज आणि एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालून त्यांनी लग्न केलं होतं. पण यावेळेस संपूर्ण कुटुंबिय व आप्तस्वकीय यांच्यासोबत सोनालीचा साग्रसंगीत विवाहसोहळा पार पडला.

सोनाली सध्या पती कुणालसोबत आपला तिसरा हनिमून साजरा करतेय. यासाठी त्यांनी मेक्सिकोची निवड केलीय. अप्सरेच्या परदेशातील हनिमूनचे फोटो  सध्या सोशल मिडीयावर बरेच व्हायरल होत आहेत. 

सोनालीने पहिल्या लग्नानंतर मालदिव आणि आफ्रिकेत आपले दोन हनिमून साजरे केले होते. त्यामुळे  मेक्सिकोतला तिचा हा तिसरा हनिमून आहे. 

मेक्सिकोच्या समुद्रकिना-यावर  हनिमून एन्जॉय करताना सोनालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. 

अप्सरेच्या प्रत्येक पोजमधले फोटो चाहत्यांना घायाळ करतायत. 

सोनाली मोनोकिनीमध्ये धम्माल मौजमजा करताना पाहायाला मिळाली. 

आपल्या हनिमूनचे प्रत्येक अपडेट् ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवतेय.

Recommended

Loading...
Share