'धर्मवीर'वरुन एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवणारी ती सोशल मिडीया पोस्ट व्हायरल

By  
on  

धर्मवीर हा आनंद दिघेंच्या आयुष्यातील ठळक घडामोडींवर, प्रसंगावर बेतला आहे. संघटना बांधणीसाठी आणि समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेणारं हे सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व. ठाण्याने आनंद दिघेंचा झंझावात पाहिला. तळागाळातील लोकांचा विचार, गोर-गरिबांच्या-गरजवंताच्या मदतीला धावून जाणं, भगिनी-महिलांचा आदर जपणं आणि अन्याय-जुलूम करणा-यांना जरब बसवणं हे आनंद दिघेंच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य.  या लोकनेत्याचा जीवनप्रवास सिनेमाच्या रूपानं प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी असल्यानं नेतेमंडळींनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चित्रपट पाहिलाय. सिनेमाला रसिकांचा -समिक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असतानाच सिनेमाबाबत एक वेगळीच चर्चा रंगताना दिसतेय.

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट आणला जातोय, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. असं असतानात सध्या एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. दिवंगत आनंद दिघे यांच्या गाडीवर १२ वर्षे चालक म्हणून काम केलेल्या पीटर डिसुझा यांच्या नावानं ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघे यांच्यासाठी नव्हे तर एकनाथ शिंदे यांचं मार्केटिंग करण्यासाठी आहे, असं म्हटलंय. 

 

ह्या पोस्टमुळे खुप गदारोळ माजला आहे. दरम्यान, ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असली तरी पीटर डिसुझा यांनी या पोस्टबद्दल काहीही माहित नसल्याचं म्हटलंय. 'माझ्या नावानं ही पोस्ट कोणी आणि का व्हायरल केली, हे माहिती नाही',असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Recommended

Loading...
Share