By  
on  

ललित म्हणतोय "चाल का बदललेली...", पाहा Video

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित "मीडियम स्पाइसी" चित्रपटातील मन प्रसन्न करणारे "चाल का बदललेली..." हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ललित प्रभाकर म्हणजेच शेफ निस्सीम या गाण्यातून हळुवारपणे आपल्या प्रेम भावना व्यक्त करताना दिसत आहे. पर्ण पेठे म्हणजेच प्राजक्ता आणि ललित एकमेकांबरोबर थोडी मस्ती, थोडं प्रेम आणि बराचसा खेळकरपणा करताना दिसत आहेत. गीतकार जितेंद्र जोशी यांच्या शब्दांना हृषीकेश सौरभ जसराज यांनी संगीत देताना गाण्याच्या सुरुवातीला शिट्टीचा खुप सुरेख वापर केला आहे तर अभय जोधपूरकर याच्या आवाजाने हे गाणे अधिकच कर्णमधुर झाले आहे. आपल्या मनातल्या अव्यक्त भावना अत्यंत सुरेल पद्धतीने व्यक्त करणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल यात शंकाच नाही.

युवा नाटककार मोहित टाकळकर "मीडियम स्पाइसी" या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असून प्रत्येकवेळी एक वेगळा विषय घेऊन चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्या विधि कासलीवाल यांची भक्कम साथ त्यांना लाभली आहे.

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित "मीडियम स्पाइसी" ची लज्जतदार डिश १७ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive