By  
on  

संध्याकाळच्या ७ च्या बातम्यांचा आवाज हरपला,प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

प्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनवर संध्याकाळी 7 च्या बातम्यांमधून त्यांचा भारदस्त आवाज घरोघरी पोहचला. त्यांच्यामुळे देश-विदेशातील घडामोडी प्रत्येकाला त्यांच्या संवेदनांसह कळायच्या. 

  दूरदर्शनमध्ये जवळपास ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं.  नमस्कार मी प्रदीप भिडे...असं म्हणत त्यांनी भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात केली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive