By  
on  

हृता दुर्गुळे ठरली इन्स्टाग्राम टॉपर, 2.5 मिलियन फॉलोअर्स असणारी पहिलीच मराठमोळी अभिनेत्री!

छोट्या पडद्यावर लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला ओळखले जाते. तसंच सोशल मीडियावर देखील हृताचे असंख्य चाहते आहेत. दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकताच हृताने इन्स्टाग्रामवर वर २५ लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आणि सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी हृता ही पहिलीच मराठी अभिनेत्री ठरली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

हृता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. हृता तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांशी शेयर करत असते. हृताच्या या २५ लाख फॉलोअर्सच्या यशाबद्दल तिने चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओखाली कॅप्शन मध्ये, '२५ लाखांचा टप्पा पार... तुम्ही सर्वांनी केलेल्या निरपेक्ष प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झालं आहे... तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे..' असं म्हटलं आहे. तसेच हृताच्या या व्हीडीओखाली कमेंट्स मध्ये अनेक मराठी कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत तिचं अभिनंदन केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

 

हृतासाठी हे वर्ष खास आहे कारण, नुकतंच तिचं लग्न झालं असून हृता तिच्या आगामी 'अनन्या' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण   करत आहे. त्याचबरोबर तिच्या 'टाईमपास ३'  या सिनेमातील बिनधास्त-बेधडक व्यक्तिरेखेची चर्चा रंगलीय, तसंच छोट्या पडद्यावरची तिची मन उडू उडू झालं ही मालिकासुध्दा प्रसिध्दीच्या शिखरावर आहे. तर दुसरीकडे रंगभूमीवरचं तिचं दादा एक गुड न्यूज आहे हे नाटकसुध्दा गाजतंय. एकूणच काय सर्वच बाबतीत ह्रता टॉपर ठरतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive