By  
on  

'तुझे याद ना मेरी आये' ! श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकरचा पाहा हा भन्नाट Video

अभिनेत्री श्रुती मराठे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर अनेक हटके फोटोस शेयर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. याशिवाय ती काही रिल्स सुद्धा शेयर करत असते. नुकतंच श्रुतीने पती अभिनेता गौरव घाटणेकर सोबतचा एक मजेशीर रील इंस्टाग्रामवर शेयर केला असून या कपलचा हा रील व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे. 

श्रुती मराठेने तिच्या पतीसोबतचा भन्नाट रील इंस्टावर शेयर केला आहे. 'तुझे याद ना मेरी आये' या हिंदी गाण्यावर आधारित हे रील आहे. ज्यात श्रुती गाण्यामधील ओळी सुरु होण्या अगोदरचं गात आहे आणि त्यामुळे तिची फजिती होत आहे. तिची ही फजिती आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून हसायला येत आहे. तसेच या व्हिडिओत तिच्या मागे उभा असणारा तिचा पती  गौरव हा देखील गालातल्या गालात हसत आहे. त्यामुळे या रीलमध्ये श्रुती आणि गौरवचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळत असून त्यांचा हा रील व्हिडीओ नेटकऱ्यांना  खळखळून हसवतोआहे. 'तुझे याद ना मेरी आये' या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर आधारित या कॉमेडी रीलवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीसकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

श्रुती आणि गौरव यांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला असून त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्स मधून काम केलं आहे. श्रुती आणि गौरव या सेलिब्रिटी कपलची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. ती पती सोबत सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive