By  
on  

चिमुकलीची ही शिवभक्ती पाहून भारावले अमोल कोल्हे ; पाहा हा खास व्हिडीओ

नुकताच ६ जून रोजी सगळीकडे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यानिमित्ताने तमाम शिवप्रेमींनी त्यांच्या त्यांच्या परीने हा सोहळा साजरा करत शिवरायांना वंदन केले.

या सगळ्यात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला जो पाहून अक्षरशः गहिवरून येत आहे. 

त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत एक चिमुकली मुलगी दिसत आहे. जी शिवाजी महाराजांची एक छोटीशी मूर्ती घेऊन गडावर जात आहे. त्यानंतर ती मूर्तीवर कलशाने दुधाचा अभिषेक करते आणि मूर्तीला नमस्कार करते. नंतर स्वतःला कुंकू लावते. तसंच या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'श्रीपती, भूपती, गजपती हा आमचा राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी' हे गाणं वाजतंय. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी भारावून टाकणारा आहे.

 

अमोल कोल्हेंनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर हा खास व्हिडिओ शेयर करत या मुलीची माहिती दिली आहे. ही मुलगी बेळगावमध्ये मच्छे इथली राहणारी असून तिचं नाव 'रुत्वी गजानन जैनोजी' असं आहे आणि ती अवघ्या अडीच वर्षांची आहे.

तसेच हा व्हिडीओ शेयर करताना त्यांनी, "चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आवर्जून शेअर करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय". असं म्हटलं आहे.

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत असून व्हिडीओमधील या अडीच वर्षाच्या रुत्वीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive