By  
on  

कोण होतीस तू काय झालीस तू! यश-नेहाच्या हळदीला सिम्मीची झाली अशी अवस्था

छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्ये सध्या लग्नसराईची धामधूम आहे. पण त्यापैकी माझी तुझी रेशीमगाठच्या यश-नेहाच्या लग्नसोहळ्याकडे रसिकांचं विशेष लक्ष आहे. य़श आणि  नेहाचा नुकताच साखरपुडा झाला. त्यानंतर यशची धमाकेदार बॅचलर्स पार्टीसुध्दा पार पडली. मग मेहंदी आणि आता हळदीची धामधूम मालिकेत पाहायला मिळतेय. 

 मालिकेतील हळदी समारंभाचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात सिम्मीचा लुक पाहून सर्वांना हसू येत आहे. चाळीत येऊन मोठ्या तो-यात नेहाची होणारी सासू म्हणून सिम्मी मिरवतेय. तिचा गर्विष्ठपणा सर्वांच्याच नजरेत येतोय.प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये चकाचक मेकअप करुन हळदीच्या लुकमध्ये मोठ्या ऐटीत सिम्मी खोलीतून बाहेर येते. आपल्याला कोणीच हळद लावणार अशा तोऱ्यात सिम्मी मिरवत असते. बाहेर येताच सिम्मीला हळदीला जमलेली नेहाची चाळीतली गँग बाजूला घेऊन तिच्या तोंडाला हळद फासते. हळद लावायच्या आधीची सिम्मी आणि  हळद लावल्यानंतरची सिम्मी पाहून सगळ्यांची झोप उडाली आहे. प्रत्येकाच्या हळदीला हेच घडतं पण सिम्मीबरोबर जे झालं ते पाहून हसू आवरता आलेलं नाही.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive