By  
on  

संगीतकार अतुल गोगावले यांनी घेतली सर्वात महागडी बाईक ; किंमत ऐकून व्हाल थक्क!

अजय-अतुल या संगीतकार जोडीने त्यांच्या गाण्यांनी संगीतप्रेमींवर गारुड केलं आहे. अजय-अतुल हे इंडियन आयडलच्या पहिल्या मराठी पर्वाची परीक्षक होते. तसंच नुकत्याच आलेल्या 'चंद्रमुखी' या सिनेमातील गाण्यांना त्यांचचं संगीत होतं, त्यांच्या या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. आपल्या संगीत आणि गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी ही जोडी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तसेच यानिमित्ताने त्यांचं स्वप्न देखील पूर्ण झाले आहे.

अजय-अतुल या जोडगोळीपैकी अतुल गोगावले यांना गाड्यांची प्रचंड क्रेझ आहे. अनेकदा ते बाईकवरून लाँग ड्राईव्हला वगैरे जात असतात.  त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अतुल गोगावले यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत.

 

यामध्ये त्यांनी नुकतीच त्यांची ड्रीम बाईक खरेदी केल्याचं दिसून येत आहे. अतुल गोगावले यांना गेल्या कित्येक काळापासून त्याची स्वप्नातील ही बाईक खरेदी करायची होती आणि अखेर स्वकष्टातून त्यांनी ही बाईक खरेदी केलीचं. या नव्या पाहुण्याचं त्यांनी दणक्यात स्वागत केलं असून त्याची छोटीशी झलक चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

"मी माझ्या स्वप्नातली BMW R1250 GS ही बाइक घेतली आहे. आणि मला एकचं सांगाचे आहे ही खूपच बेस्ट आहे", असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली. बीएमडब्ल्यू R1250 GS ऍडव्हेंचर प्रो या बाइकची किंमत २२ लाखांपर्यंत असल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान त्यांच्या या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांचं अभिनंदन केलंय तर काही कलाकार मंडळींनी देखील त्यांना कमेंट्स मध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive