By  
on  

'इंडियाज लाफ्टर चॅलेंज' मध्ये सागर कारंडे आणि भारत गणेशपुरेची एंट्री!

झी मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचं भरपूर मनोरंजन केलं. या कार्यक्रमातून मराठीतील नाटक, सिनेमाचं प्रमोशन केले जाते. त्यानंतर या कार्यक्रमात हिंदी सिनेमांचे देखील प्रमोशन दणक्यात होते, त्यामुळे हा कार्यक्रम जगभर प्रसिद्ध आहे. 

भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे या कलाकार 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधील त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण आता लवकरच या शोमधून दोन कलाकार एक्झिट घेणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 

भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे दोघे लवकरच 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा निरोप घेणार आहे, असं म्हटलं जात आहे. सध्या सोनी टिव्हीवरील 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओत सागर आणि भारत हे लोकांना हसवताना दिसत आहेत. तसेच या कार्यक्रमाचे परीक्षक अर्चना पुरण सिंह आणि शेखर सुमान हे आहेत.

दरम्यान त्यांचं हे विनोदी सादरीकरण परीक्षकांसह प्रेक्षकांना देखील आवडेल यात काही शंका नाही. पण या शो साठी ते 'चला हवा येऊ द्या' मधून एक्सिट घेणार आहेत की काय? या चर्चांना उधाण आले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive