By  
on  

बिगबॉस फेम अभिजित बिचुकले लढणार राष्ट्रपती पदाची निवडणूक!

बिगबॉस फेम अभिजित बिचुकले हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आताही पुन्हा एकदा ते एका कारणाने चर्चेत आले आहेत आणि कारण आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक. अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत नगरसेवक पासून राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. हेच बिचुकले आता राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढणार असून १०० आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे बिचुकले नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

राष्ट्रपती पदासाठी उत्सुक असणारे बिचुकले यांनी गेल्या पंचवार्षिक राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी नरेंद मोदी यांना राष्ट्रपती करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. तरुण वयात त्यांना राष्ट्रपती व्हायची इच्छा होती. पण बिचुकले यांनी आता वेगळा मार्ग निवडला असून ते काहू आमदारांशी पाठिंब्यासाठी बोलत आहेत. १०० आमदारांच्या सह्यांसाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून येत्या दोन दिवसांत याला किती यश येतंय हे कळेल. १०० आमदारांच्या सह्या मिळाल्या तर ते त्यांचा अर्ज दाखल होईल. 

दरम्यान, याआधी बिचुकले ‘किचन कल्लाकार’ या कुकरी शोमध्ये एका खेळा दरम्यान, अभिजीतसमोर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो ठेवण्यात आला होता, तेव्हा ट्रम्प यांचा फोटो पाहताच बिचुकले, "हे तर आमचे तात्या.. आमच्या गावाकडचे. अत्यंत हुशार आणि चांगला माणूस." असं म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive