By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झाली न्यूजअँकर ; न्यूजरूम मधून दिलं बुलेटिन!

अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचा 'तमाशा लाईव्ह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टिझर लॉन्च झाला होता. त्यानंतर या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे आणि सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकारांकडून विविध शक्कल लढवली जात आहे. यात सोनाली कुलकर्णी ही देखील तिच्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय... यादरम्यान सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात सोनाली न्यूज अँकरच्या रूपात एका चॅनेलच्या न्यूजरूम मध्ये बसून बातम्या देताना देतेय आणि या बातम्या देखील खऱ्याखुऱ्या बातम्या आहेत.

सोनालीने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेयर केला असून या व्हिडिओखाली तिने 'नमस्कार मी शेफाली... घेऊन आले आहे आजच्या ठळक बातम्या' ,असं कॅप्शन दिलं आहे. तसेच या व्हिडीओत सोनाली स्वत:ची ओळख शेफाली अशी करून देते. तसंच या व्हिडिओत ती खऱ्या पत्रकाराप्रमाणे बुलेटिन देताना दिसत असून या व्हिडिओत ती राजकारणापासून ते निवृत्तीनाथांच्या पालखीसोहळ्यापर्यंत सध्याच्या सगळ्या चालू घडामोडी वाचून दाखवताना दिसतेय.

यावरून हे नेमकं काय प्रकरण आहे ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण हा तिच्या आगामी 'तमाशा लाईव्ह' या सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग आहे. या सिनेमात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारत असून याच सिनेमाच्या निमित्तानं तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनालीचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला असून या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि  कमेंट्सचा वर्षाव केलाय. "तू काहीही करू शकतेस", अशा शब्दांत एका चाहत्यानं तिचं कौतुक केलं आहे, तर एकाने "तू खरोखर न्यूज अँकर असतीस तर मी रोज न्यूज बघितल्या असत्या", अशी भन्नाट कमेंट केली आहे.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive